• भाषा : A

पदाधिकारी

ग्रामसेवक:ग्राम पंचायतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळखले जाते. यापूर्वी त्यांना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळखले जायचे. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

सरपंच व उपसरपंच:ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात. (२०१७ सालापासून सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होत आहे). सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे पद खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलाविण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतो. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेला आधिकारी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवितो.

ग्रामपंचायत कार्यकारिणी सन २०२१-२५

१. सौ . कविता संतोष कचरे सरपंच
२. श्री. रवींद्र मारुती वाघचौरे उपसरपंच
3. श्री. किशोर दत्तात्रय बागूल सदस्य
४. श्री. झुंजारराव शिवाजीराव देशमुख सदस्य
५ . श्री. सोमनाथ वालुबा रोकडे सदस्य
६. सौ . वैशाली मंगेश शिंदे सदस्या
७. सौ . सीमा भगवान जाधव सदस्या
८. श्री. सुनील लक्षणराव सोनवणे सदस्य
९. सौ . सविता शरद जगताप सदस्या
१०. सौ . विनीता अमोल सोनवणे सदस्या
११. सौ . लताबाई एकनाथ जानराव सदस्या
१२. सौ . मंदाबई किसनराव धनगे सदस्या
१३. श्री. संजय चिमजीराव ढोले सदस्य
१४. श्री.. योगेश रावसाहेब जाहगिरदार सदस्य
१५. श्री. अमोल बाळासाहेब सोनवणे सदस्य
१६ . सौ . अश्विनी योगेश खैरणार सदस्या
१७ . सौ . रेखा राजेंद्र पवार सदस्या
१८. श्री. बाळासाहेब कारभारी बोरडे ग्रा. प. अ.