ज्या आदिवासी पारधी व्यक्तीकडे राहण्यास स्वत:चे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांना पक्की घरे बांधून देऊन, त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे.
✓ लाभार्थी पात्रता:–
1. ज्या पारधी लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा अथवा कच्चे घरे आहे अशा लाभार्थ्यांस योजनेचा लाभ देता येईल.
2. इतर कोणत्याही योजनेतून घरकुलाचा लाभ त्या कुटुंबास पूर्वी देण्यात आलेला नसावा.
3. आदिवासी पारधी समाजातील विधवा, निराधार व परित्यक्त्या स्त्रियांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. 7/12 उतारा व नमुना 8-अ
5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला
8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
9. ग्रामसभेचा ठराव